बोईसर आगारातील एकूण ७८ कामगारांवर कारवाई

न्यूज महाराष्ट्र 24 बोईसर प्रतिनिधी: दिनांक ७ : विलीनकरण्याच्या मागणी साठी एसटी कर्मचाऱ्यांच्या संप अद्यापही सुरूच आहे. निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यास सुरुवात केली आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याची आवाहन करून देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे सत्र सुरू केले आहे. बोईसर आगारातील ५६ कामगारांची सेवा समाप्ती केली असून, ०७ कामगारांना निलंबित व १५ कामगारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

विलीनीकरणाच्या मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या संप अद्यापही सुरू आहे. महामंडळाने कामगारांना अंतरिम वेतन वाढ, निलंबन, आणि बडतर्फीची कारवाई करूनही कर्मचारी कामावर येण्यास तयार नसल्याने, महामंडळाने निवृत्त झालेल्या तसेच सेवानिवृत्ती घेतलेल्या चालक कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महामंडळाने जाहिरात देखील केली आहे. बोईसर आगारातील ५६ कामगारांना सेवासमाप्ती, ०७ कामगारांना निलंबित, आणि १५ कामगारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.एकूण ७८ कामगारांवर कारवाई केल्यानंतर ही कामावर फक्त दोनच कामगार हे आज रोजी हजर झाले आहेत.
यामुळे आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. एसटीचा संप बऱ्याच दिवसांपासून सुरू असून त्यामुळे सर्व सामान्य जनतेला व विद्यार्थांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.