संपादकीय

ड्रग माफिया निलेश सुर्वे वर कारवाई साठी बोईसर पोलीस ठाण्यावर मोर्चा

न्यूज महाराष्ट्र 24 प्रतिनिधी :- औद्योगिक वसाहतीसह अनेक शाळा कॉलेजेस व लाखोंच्या वरती लोकवस्ती असलेल्या बोईसरसह, पालघर परिसरात सहजपणे मिळणाऱ्या अंमली पदार्थांची विकणाऱ्या तस्करांवर कारवाई व भविष्यात असे गंभीर गुन्हे घडू नयेत. तरुण पिढी व्यसनाधीन होऊन बरबाद होऊ नये.या साठी बोईसर पोलीस ठाण्यावर रानी शीगाव च्या गावकऱ्यांनी मोर्चा काढत ड्रग माफिया वर कारवाई करण्यात यावी यासाठी राणी शीगाव ते बोईसर पोलीस स्टेशन असा सात किलोमीट पायी चालत मोर्चा काढला होता.

मागील अनेक वर्षांपासून नीलेश सुर्वे हा व्यक्ती बोईसर पालघर व वाणगांव परिसरात राजरोसपणे ड्रग अंमली पदार्थांची विक्री करित आहे. पोलीस मात्र या ड्रग पेडलरवरती कारवाई न करता त्याचे सेवन करणाऱ्या तरुणांवर नेहमीच कारवाई करताना दिसतात. याचा परिणाम आता स्पष्ट दिसू लागला असून दोन दिवसापूर्वीच बोईसरमध्ये अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणाने रस्त्यावरून चालत असलेल्या नागरिकांवर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात राणी-शिगाव मधील रहिवाशी असलेल्या एकाचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी आरोपी व ड्रग पेडलर सुर्वेवरती बोईसर पोलिसांनी कठोर कारवाई करावी यासाठी राणीशीगावच्या नागरिकांनी ७ किलोमीटर पायी चालत थेट बोईसर पोलीस स्टेशन वरती मोर्चा काढण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तर बोईसरच्या परिसरामध्ये चरस, गांजा या सारखे ड्रग सहजपणे मिळत आहे. याची विक्री निलेश सुर्वे हा रेल्वे स्टेशनचा आधार घेत करित असल्याचे जग जाहिर असताना ही त्याच्यावर अद्याप कोणतीच कारवाई केली गेली नाही व जातही नाही यामुळे शकडो तरूण बरबाद होत आहेत. परिसरामध्ये परप्रांतीय भाडेकरू मोठ्या प्रमाणात राहत आहेत. त्यांची कायदेशीर माहिती पोलीस स्टेशनला चाळ मालक देत नाहीत. बेकायदेशीर अंमली पदार्थ विकणाऱ्या गांजा, चरस तस्करांना जेरबंद करा व कारवाईसाठी मयत बाळू मेढाच्या नातेवाईक व नागरिकांनी बोईसर पोलीस स्टेशनमध्ये मोर्चा काढला.

दरम्यान, यापूर्वी ही एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी सुद्धा गावकर्‍यांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून निषेध नोंदवला होता.बोईसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी के. एस. हेगाजे, बोईसर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी आंदोलनकारी लोकांना शांतता राखण्यासाठी आव्हान करत कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश धोडी, युवा प्रतिष्ठनचे विक्रम धोडी, महेश जाधव, आनंद धोडी, गावातील नागरीक व मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!