संपादकीय
विराज कंपनीच्या विरोधात हजारो कामगारांनी काढला मोर्चा

न्यूज महाराष्ट्र 24 प्रतिनिधी :- तारापूर औद्योगिक क्षेत्रातील नेहमीच चर्चेत राहणारी स्टील उत्पादक कंपनी विराज प्रोफाईल लि.या उद्योग समूहात दिनांक २ रोजी रात्र पाळीत कामावर गेलेल्या कामगारांना परत एकदा बंदी बनवून जबरदस्तीने युनियनच्या सदस्यत्वाचा राजीनामा घेण्याचा प्रयत्न झाल्याने व यासाठी पोलीसबळाचा वापर केल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी बोईसर पूर्वेकडे असलेल्या मान युनिट पासून जवळपास ७ किलोमिटर पायी चालत बोईसर औद्योगिक वसाहतीतील असलेल्या कंपनी पर्यंत १५०० कामगारांनी मोर्चा काढला होता.

युनियन लीडर आणि कामगारांशी कंपनी व्यवस्थापकाने कोणतीही चर्चा न केल्याने विराज कंपनीच्या सहा युनिट च्या गेट वरती ठिय्या देत रात्रीपासून काम बंद आंदोलन केले आहे.