चिंचणी येथे योग दिन साजरा

न्यूज महाराष्ट्र 24 प्रतिनिधी : चिंचणी-तारापूर संस्थेच्या वतीने ‘ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष ‘ आणि ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ‘ निमित्ताने संस्थेच्या सर्व शाखामधील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थांसाठी व जेष्ठ नागरिकांसाठी योग शिबीराचे आयोजन करण्यात आले. शासनाच्या सुदृढ राष्ट्रनिर्मानाच्या आवाहनास प्रतिसाद देण्याबरोबरच परिसरातील नागरिकांमध्ये योगजागृती निर्माण करणे व संस्थेतील विद्यार्थी, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक आरोग्यसंपन्न रहावेत अशा व्यापक उद्देशाने सलग तीन दिवसांपासून योग सराव शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक पर्यवेक्षक प्रा. संजय घरत आणि पतंजलीचे जिल्हा युवा प्रभारी तथा संस्थेचे योग शिक्षक प्रा.सुधीर भांडवलकर यांनी शिबीरार्थींना योगप्राणायामांची शास्त्रीय माहिती व प्रात्यक्षिके दाखवून सराव करुन घेतला. यावेळी संस्थेचे चेअरमन रजनीकांत श्रॉफ यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी संस्थेच्या सदस्या रमिलाबेन श्रॉफ, महेश पाटील, दुभाष अंभिरे, के.डी. व एम.के. ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य महेश रावते, उप-मुख्याध्यापक सुनिल बैसाणे, उप-प्राचार्य संगिता चुरी, पर्यवेक्षिका स्वाती राऊत, विभाग प्रमुख दिनकर टेकनर श्रॉफ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.प्रमिला राऊत, उप-प्राचार्या डॉ.सुचिता करवीर, आदि प्राध्यापक व ग्रामस्त उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन रजनीकांत श्रॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली योगदिनाचे आयोजन करण्यात आले.