चोरीचा मुद्देमालासह गाडी केली बोईसर पोलीस ठाण्यात जमा परंतु अजून ही गुन्हा दाखल नाही

न्यूज महाराष्ट्र 24 प्रतिनिधी : बोईसर परिसरात चोरींचे प्रमाण बरेच वाढलेले दिसून येत आहे. चोरांना पोलिसांची जराही भीती दिसत नसल्याचे सध्या समोर येत आहे.चोर चोरी करताना जागेवर गाडी लावून गाडी मध्ये चोरीचा माल बिनधास्तपणे पोलिसांचा जराही धाक न बाळगता चोरी करण्याची घटना रविरारी रात्री घडली असून चोरी साठी वापरण्यात आलेल्या महिंद्रा कंपनीची पीकअप गाडी पोलीस ठाण्यात सदगुरू कन्स्ट्रक्शन चे मालक यांनी सोमवारी रात्री जमा केली आहे.


बोईसर येथील मैत्री पार्क यशवंत संकल्प च्या बाजूला सदगुरू कन्स्ट्रक्शन आणि अनोज इंटर प्राईजेश च्या मालकीचे जागेवर त्यांचे सेंट्रिंग प्लेट लिफ्ट खंबा असे बांधकामा साठी लागणारे साहित्य पडलेले असून रविवारी रात्री ११ वाजे च्या सुमारास गाडी नंबर एम एच ४८ सी बी ४८९२ महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी मध्ये तीन अज्ञात व्यक्ती येवून गाडीत सेंट्रींग साहित्य व लिफ्ट खंबा बिनधास्तपणे पोलिसांचा जराही धाक न बाळगता चोरी करून साहित्य गाडीमध्ये टाकत असताना कामगारांनी त्यांना बघितले, त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यामधील दोन्ही चोरांनी तेथून पळ काढला.परंतु गाडी चालक गाडी सोडून न जाता तिथेच थांबला.

आणि गाडी भाड्याने आणली आहे.मी त्यांना तुमच्याकडे आणतो मग तुम्हाला जे काय करायचे ते करा.असे त्या चोराने सांगितले.गाडी आणि गाडीमधील चोरीचा मुद्देमाल तसाच सोडून तो त्यांना आणतो या साठी गेला तो परत आलाच नाही.चोरीचा मुद्देमालासह गाडी बोईसर पोलीस ठाण्यात जमा करून दिली आहे.परंतु अजूनही बोईसर पोलीस ठाण्यात या चोरीची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पोलीस ठाण्यात चोरी करणारे चोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.