
एच. लोखंडे
सफाळे :- सफाळे रेल्वे स्टेशन ( पश्चिम ) पासून अंदाजे ५ ते ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या चाफेवाडी – विराथन बुद्रुक ता,जि पालघर येथील श्री. विलास बंड्या घरत हे सन २००४ पासून फक्त लालमाती पासून पर्यावरण पुरक श्री गणेची हाताने मुर्ती तयार करून ( कोणत्याही साचा न वापरता )
व मुर्तीस रेखीव आकार येण्यासाठी हातानेच कोरीवकाम करून पॉलिश पेपर व्दारा सुबक आकार देत मुर्ती तयार करीत आहे.
श्रीगणेशाची मूर्तीला रंगविण्यासाठी, विविध रंगाचा वापर करून, स्व:ताच रंगरंगोटी करून सुबक, रेखीव, मनमोहन, आल्हाददायक श्री ची मुर्ती निर्मिती करून स्व:ताच्या घरात, सुशोभीकरण युक्त मखर सजवून अनंतचतुर्थीला स्थापना करून मनोभावे पुजा करीत आहे. सदर पर्यावरणावर पुरक मुर्तीला पाहण्यासाठी व नमन करण्यासाठी अनेक गणेशभक्त भेट देऊन नतमस्तक होतात. सन २०२२ या वर्षी विलास घरत यांना स्वहस्ते पर्यावरण श्रीगणेश मुर्ती बनवून रंगकाम करून, स्थापना करण्याचे १८ वर्षे पुर्ण होत आहेत. नोकरी करून, स्वहस्ते श्रीगणेश मुर्ती बनवून रंगकाम करून आपली श्रीगणेशाची सेवा करीत आहे. त्यांच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत असून, पाठीवर शाबासकीची थाप मिळत आहे.