क्रीडा

Ind vs Aus: कांगारुंकडून धावांचा मोठा डोंगर सर, मोहालीत टीम इंडिया 4 विकेट्सनी पराभूत

मोहाली :- मोहाली टी २० त २०८ धावांचा डोंगर उभारल्यानंतरही रोहित शर्माच्या टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला. कॅमेरुन ग्रीन आणि इतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियानं सामना ४ विकेट्स राखून जिंकला.ग्रीननं ३० बॉलमध्ये ६१ धावांची खेळी करुन ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. याशिवाय फिंच (२२) स्टीव्ह स्मिथ (३५), मॅथ्यू वेड (४५), टीम डेव्हिड (१८) यांच्या खेळीनं ऑस्ट्रेलियाला विजयाच्या दिशेनं नेलं. या विजयासह ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ग्रीनला नशीबाची साथ ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या कॅमेरुन ग्रीनला बॅटिंगवेळी नशीबाची चांगली साथ मिळाली.ऑस्ट्रेलियन डावाच्या पाचव्याच ओव्हरमध्ये युजवेंद्र चहलचा बॉल ग्रीनच्या पॅडवर आदळला. सर्वांनी एलबीडब्ल्यूसाठी अपीलही केली. पण अम्पायरनी तो निर्णय फेटाळला. मात्र त्यानंतर डीआरएस घेण्यावरुन रोहित शर्मा, विराट कोहली आणि विकेट कीपर दिनेश कार्तिक एकमेकांकडे पाहत बसले.पण डीआरएस काही घेतला नाही. त्यानंतर टीव्ही रिप्लेत मात्र तो बॉल थेट स्टंप्सवर जाऊन लागत असल्याचं दिसलं. त्यावेळी ग्रीन अवघ्या १७ धावांवर खेळत होता. त्यानंतर ४२ धावांवर असताना अत्रर पटेलनंही ग्रीनचं सोपं कॅच सोडलं.त्यामुळे ग्रीनला अर्धशतक करण्याची संधी मिळाली. ग्रीननं आपल्या ्इनिंगमध्ये ३० बॉल्समध्ये ८ फोर आणि ४ सिक्ससह ६१ धावा फटकावल्या.१९ वी ओव्हर पुन्हा महागडी अखेरच्या क्षणी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १२ बॉलमध्ये १८ धावा हव्या होत्या. पण त्या निर्णायक ओव्हरमध्ये अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं १६ धावा मोजल्या आणि सामना टीम इंडियाच्या हातून निसटला.याआधी आशिया कपमध्येही श्रीलंकेविरुद्धही भुवनेश्वरची १९ वी ओव्हर महागडी ठरली होती. राहुल, पंड्या, सूर्यकुमारची फटकेबाजी त्याआधी लोकेश राहुल, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमारच्या फटकेबाजीमुळे भारतानं २० ओव्हर्समध्ये ६ बाद २०८ धावा फटकावल्या होत्या. हार्दिक पंड्यानं ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची पिसं काढताना चौफेर फटकेबाजी केली. त्याच्या फलंदाजीसमोर कांगारुंच्या बॉलर्सनी अक्षरश: लोटांगण घातलं.हार्दिकनं आपल्या नाबाद ७१ धावांच्या खेळीत तब्बल ७ फोर आणि पाच षटकार ठोकले. टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलनं आशिया कपमधला आपला फॉर्म कायम राखला. राहुलनं आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात ६२ धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा एकदा राहुलच्या बॅटमधून मोठी खेळी आली.त्यानंत ३५ बॉलमध्ये ५५ धावा फटकावल्या. त्यात ४ फोर आणि ३ सिक्सर्सचा समावेश होता. राहुलचं आंतरराष्ट्रीय टी२० तलं हे आजवरचं १८ वं अर्धशतक ठरलं. सूर्यकुमारनंही धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेताना २५ बॉलमध्ये ४६ धावा फटकावल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!