क्रीडा

भारतीय महिला संघाने 23 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये जिंकली वनडे मालिका

भारतीय महिला संघाने बुधवारी सेंट लॉरेन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर (नाबाद 143) पाठोपाठ वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर (4 विकेट) च्या घातक गोलंदाजीच्या जोरावर यजमान इंग्लंडचा 88 धावांनी पराभव केला.भारताने पहिला एकदिवसीय सामनाही सात गडी राखून जिंकला होता.दरम्यान, भारताने (India) 23 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली आहे. यापूर्वी भारतीय महिला संघाने 1999 मध्ये इंग्लंडमध्ये (England) एकदिवसीय मालिका जिंकली होती. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 5 गडी गमावून 333 धावा केल्या, जी वनडे क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. या मोठ्या धावसंख्येसमोर इंग्लंडचा संघ संपूर्ण षटकेही खेळू शकला नाही आणि 44.2 षटकांत 245 धावांत गारद झाला.दुसरीकडे, यजमानांसाठी डॅनियल व्याटने सर्वाधिक 65 आणि एलिस केप्सी आणि अ‍ॅमी जोन्सने 39-39 धावा केल्या. भारतीय संघाकडून रेणुकाच्या चार बळींशिवाय दीप्ती शर्मा आणि डी हेमलता यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.हरमनप्रीत कौरचे पाचवे वनडे शतक, भारताने दुसरी सर्वोच्च धावसंख्या केलीतत्पूर्वी, भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 5 गडी गमावून 333 धावांची मजल मारली. भारताला या धावसंख्येपर्यंत नेण्यात कर्णधार हरमनप्रीत कौरचा (Harmanpreet Kaur) मोलाचा वाटा होता, तिने कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. हरमनप्रीत कौरने 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 100 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात तिने 143 धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान हरमनप्रीतने 111 चेंडूत 18 चौकार आणि चार षटकार मारले. हरमनप्रीतच्या विस्फोटक फलंदाजीमुळे भारताने शेवटच्या पाच षटकांत 80 धावा काढल्या आणि 50 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 333 धावा केल्या. पूजा वस्त्राकरने 18(16) आणि दीप्ती शर्माने 15(09) चे योगदान दिले.

तसेच, स्मृती मंधानाने आपला शानदार फॉर्म कायम ठेवत 51 चेंडूत 40 धावा केल्या. तर यास्तिका भाटिया (26) सोबत दुसऱ्या विकेटसाठी तिने 54 धावांची भागीदारी केली. स्मृती आणि यस्तिका बाद झाल्यानंतर हरमनप्रीतने आघाडी घेत हरलीनसोबत चौथ्या विकेटसाठी 113 धावांची जबरदस्त भागीदारी केली. हरलीनने 72 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांसह 58 धावा करत आपले पहिले एकदिवसीय अर्धशतक झळकावले.शिवाय, हरलीन पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर हरमनप्रीतने डावाची संपूर्ण कमान आपल्या हातात घेतली. वनडेतील तिने आपले पाचवे शतक पूर्ण केले. हरमनप्रीतने 111 चेंडूत 143 धावांची नाबाद खेळी करताना 18 चौकार आणि चार षटकार ठोकले. इंग्लंडकडून लॉरेन बेल, केट क्रॉस, फ्रेया केम्प, शार्लोट डीन आणि सोफी एक्लेस्टन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. केम्प (10 षटके, 82 धावा) आणि बेल (10 षटके, 79 धावा) हे इंग्लंडसाठी महागडे ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!