
न्यूज महाराष्ट्र 24
लोक हल्ली सहज मद्यपान करतात. मात्र जर तुम्ही वारंवार मद्यपान करत असाल आणि त्यानंतर तुम्ही अचानक मद्यपान सोडल्यास त्याचेही तुमच्या आरोग्यावर काही परिणाम होतात.
मुंबई, ९ ऑक्टोबर : हल्ली दारू पिणं म्हणजेच अल्कोहोल घेणं खूप सामान्य गोष्ट झाली आहे. लोक आनंद साजरा करण्यासाठी बऱ्याचदा समवयस्कांसोबत मद्यपान करतात. शनिवार रविवार हे तर मद्यपानासाठी राखीव असलेले दिवस असतात. कारण या दिवशी लोकांना सुट्टी असते. थोडक्यात लोक हल्ली सहज मद्यपान करतात. मात्र जर तुम्ही वारंवार मद्यपान करत असाल आणि त्यानंतर तुम्ही अचानक मद्यपान सोडल्यास त्याचेही तुमच्या आरोग्यावर काही परिणाम होतात.
The Health Site.com ने दिलेल्या माहितीनुसार, अचानक मद्यपान बंद केल्यास आपल्या शरीरावर त्याचे कसे वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणूनच मद्यपान करणे कायमचे सोडताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुम्ही डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता. जाणून घेऊया अचानक मद्यपान सोडल्यास तुमच्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात.
मद्यपान केल्यानंतर साधारणपणे कोणत्याही व्यक्तीला शांत आणि लवकर झोप लागते. ज्या लोकांना कायम मद्यपान करून झोपण्याची सवय असते. त्यांना मद्यपान सोडल्यास कित्तेक दिवस लवकर झोप लागत नाही. कारण तुमच्या मन आणि मेंदूला मद्यपान केल्यानंतरच शांत होण्याची सवय लागलेली असते. रात्री पुरेशी झोप न मिळाल्याने सकाळी थकवा आणि आळस येऊ शकतो. मात्र असे काही दिवस होईल. काही दिवस हा त्रास सहन केल्यास तुमची मद्यपानाची सवय सुटेल आणि त्यानंतर तुम्ही आनंदी आणि स्वस्थ जीवन जगू शकता.