विशेषसामाजिक

माकडाला दगड मारायला गेला, तर माकडानेच त्याला.. व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल…

न्यूज महाराष्ट्र 24

जशास तसे ही म्हण आपण अनेकदा ऐकतो. आपल्याला कोणी त्रास दिला किंवा वाईट वागले तर आपणही त्या व्यक्तीशी तसेच वागतो. आता हे व्यक्तींबाबत ठिक असले तरी प्राण्यांनाही हे समजते यावर आपला कदाचित विश्वास बसणार नाही.

माकड हा प्राणी माणसाचाच पूर्वज असल्याने त्याच्याकडे माणसांप्रमाणे बुद्धी आणि भावना असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. मात्र माकडही आपल्यासारखेच आपल्याशी मस्ती करते हे आपण पाहिले असेलच असे नाही. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये माकड कशाप्रकारे बदमाशी करते हे दिसून येते आहे.

माकडं काही वेळा आपल्या वस्तीत अगदी सहज येतात. घराच्या आजुबाजूला असणाऱ्या झाडांवर माकडं कशापद्धतीने येतात हा अनुभव आपणही काही वेळा घेतला असेल. आपल्या घरावर माकडं आली तर आपल्याला एकतर त्यांची भिती वाटते आणि ते घरात घुसू नयेत म्हणून आपण त्याला त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतो. एक व्यक्ती अशाचप्रकारे आपल्या घरावर आलेल्या माकडाला हाकलण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. यावेळी माकडाला हुसकावण्यासाठी ही व्यक्ती आधी हात उगारतो. त्यानंतर खाली वाकून माकडाला मारण्यासाठी दगड घेण्याच्या मारण्याच्या बेतात असतो.

तेवढ्यात व्यक्ती दगड घेण्यासाठी वाकलेला असतानाच हे माकड अतिशय चलाखीने माणसाच्या अंगावर वेगाने उडी घेते. माकड इतक्या जोरात उडी मारते की हा व्यक्ती गडबडून खाली पडतो आणि तितक्यात माकड तिकडून पळ काढते. नशीबाने हा व्यक्ती पडतो त्याठिकाणी माती असल्याने त्याला लागत नाही. मात्र आपला जीव वाचवण्यासाठी काय प्रकारची शक्कल लढवायला हवी याविषयी प्राण्यांनाही अगदी नेमके ज्ञान असते हे वेगळे सांगायला नको. माकड आणि हा व्यक्ती यांच्यातील झटापट पाहून आपल्याला हसू आल्याशिवाय राहणार नाही हेच नक्की. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तो खरा आहे की एडीटींग करुन तयार केला आहे हे मात्र समजू शकलेले नाही. मात्र एका दिवसांत हा व्हिडिओ लाखो जणांनी पाहिला असून सोशल मीडियावर तो वेगाने व्हायरलही होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!