देश-विदेशमहाराष्ट्रसामाजिक

कॅन्सल करावी लागणारी ट्रेन तिकीट आणि रिफंडची कटकट मिटली, दुस-याला तिकीट ट्रांसफर करा, कसं पहा

न्यूज महाराष्ट्र 24

रेल्वेमे प्रवास करताना आपल्याकडे कनफॉर्म तिकीट असावे लागते. मात्र अनेक वेळा आपले प्रवास करणे रद्द होते. अशा वेळी कनफॉर्म तिकीट आपण जेव्हा रद्द करतो तेव्हा आपले पैसे कापून घेतले जातात.

मात्र आता तसे होणार नाही. भारतीय रेल्वे मार्फत प्रवाशांसाठी एक खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. आज या बातमीतून याच सुविधेची माहिती घेऊ.

जेव्हा आपल्याला आपले कन्फर्म तिकीट कॅन्सल करावे लागते तेव्हा त्याची फी कट करुन उर्वरीत पैसे आपल्याला मिळतात. मात्र जर तुमच्या कुटूंबातील एखाद्या व्यक्तीला त्याच ठिकाणी प्रवास करायचा आहे आणि त्याच्याकडे तिकीट नाही. असे असल्यास तुम्ही तुमचे तिकीट त्यांना ट्रांसफर करू शकता. यात तुमचे पैसे कट होत नाहीत.हे ट्रासफर तिकीट तुम्ही तुमच्या कुटूंबातील सदस्यांनाच देऊ शकता. यासाठी २४ तासांच्या आत तुम्हाला ट्रासफरचा अर्ज करायचा असतो. त्यावर तुमचे नाव काडून ज्याला प्रचवास करायचा आहे त्याचे नाव टाकले जाते. हे तिकीट तुमचे आई, वडिल, बहिन, भाऊ, मुलं आणि पत्नी यांनाच ट्रांसफर करता येते.एमसीसी कॅन्डीडेट्सना देखील ही सुविधा आहे. यात ज्या व्यक्तीच्या नावावर तिकीट ट्रांसफर करायचे आहे त्याचे नाव आणि कागदपत्रे २४ तासांच्या आत अर्जा बरोबर सादर करावी. तसेच अन्य लग्न किंवा पार्टी अशा ठिकाणी जात असताना अशी परिस्थिती आली तर ४८ तासांच्या आत तुम्हाला ट्रांसफर अर्ज करावा लागेल. भारतीय रेल्वे ही सेवा एकदाच पुरवते. जर ट्रासफर तिकीट पुन्हा दुस-या व्यक्तीला द्यायचे असेल तर तसे केले जात नाही. भारतीय रेल्वे वारंवार तिकीट ट्रासफर करत नाही.

असे करा तिकीट ट्रांसफर

* आधी तिकीटाची प्रींटआउट घ्या.

* जवळील स्टेशनवर वर ती अर्जाबरोबर सबमिट करा.

* ज्याच्या नावावर तिकीट ट्रांसफर करायचे आहे त्याचा एक आयडी प्रुफ जमा करा.

* नंतर तिकीट ट्रांसफरसाठी अप्लाय केले जाते.

* ही सुविधा ऑनलाइन देखील आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!