देश-विदेशमहाराष्ट्र

सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कोर्टाला भावपूर्ण निरोप, पायऱ्यांवर डोकं ठेवून अभिवादन

न्यूज महाराष्ट्र 24

नवी दिल्ली: देशाचे सरन्यायाधीश उदय लळीत हे त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटच्या दिवशी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आज सुप्रीम कोर्टाच्या पायऱ्यांवर डोकं ठेवून अभिवादन करत निरोप दिला.जवळपास 37 वर्षे काम केल्यानंतर शेवटच्या दिवशी सरन्यायाधीश उदय लळीत भावूक

कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कोर्टाला भावपूर्ण निरोप दिला. सरन्यायाधीश उदय लळीत यांनी 29 वर्षे वकिली केली तर शेवटची आठ वर्षे न्यायमूर्ती म्हणून सुप्रीम कोर्टात काम केलं. त्यामुळे त्याच्यासाठी आजचा म्हणजे शेवटचा दिवस हा भावूक ठरला. त्यांनी थेट सुप्रिम कोर्टाच्या पायऱ्यावर डोकं टेकवलं आणि निरोप घेतला.तळकोकणात देवगडमधील गिर्ये गावातील उदय लळीत यांची 27 ऑगस्ट रोजी देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. सरन्यायाधीश उदय लळीत यांना सरन्यायाधीश म्हणून तीन महिन्यापेक्षा कमी कालावधी मिळाला. आता ते बुधवारी निवृत्त होणार असून त्यांची जागा न्यायाधीश धनंजय चंद्रचूड घेणार आहेत.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड 50 वे सरन्यायाधीश

न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड 9 नोव्हेंबरपासून पदभार स्वीकारणार असून ते देशाचे 50 वे सरन्यायाधीश असतील. त्यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल.

मे 2016 मध्ये न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांचे वडील वायव्ही चंद्रचूड हेही देशाचे सरन्यायाधीश राहिले आहेत. सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदी राहण्याचा विक्रमही वायव्ही चंद्रचूड यांच्या नावावर आहे. 1978 ते 1985 या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. न्या. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी पदवी घेतली आहे. 1998 मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नामांकन मिळाले. ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी शबरीमाला, समलैंगिकता, आधार आणि अयोध्या प्रकरणांसह अनेक मोठ्या खटल्यांमध्ये न्यायाधीश म्हणून काम पाहिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!