क्रीडामहाराष्ट्र

राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत मुलींमध्ये मुंबई व मुलांमध्ये पुणे विभागाने विजेतेपद पटकावले

ज्ञानेश्वर रामोशी

पालघर २२ जानेवारी :- पालघर येथे सुरू असलेल्या १४ वर्षाखाली वयोगटात राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत मुलींच्या गटातील चुरशीच्या सामन्यात मुंबई विभागाने नागपूर विभागाचा अवघ्या एक गुणांनी पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले तर मुलांच्या गटात पुणे विभागाने कोल्हापूर विभागाचा दहा गुणांनी पराभव करत अंतिम विजयावर शिक्कामोर्तब केले.

शनिवारपासून पालघर येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात हँडबॉल व बॉक्सिंगच्या स्पर्धेस सुरुवात झाली या स्पर्धेसाठी अमरावती औरंगाबाद कोल्हापूर नागपूर पुणे लातूर नाशिक मुंबई या आठ विभागातून दोन्ही गटात १६ संघाने सहभाग नोंदवला होता या स्पर्धेसाठी राज्यभरातून ६०० स्पर्धक पालघर येथे आले होते.

रविवारी सकाळी पार पडलेल्या अंतिम सामन्यात मुलींच्या विभागात मुंबई विरुद्ध नागपूर या सामन्यांमध्ये कडवी लढत पहावयास मिळाली दोन्ही संघांनी तुल्यबळ लढत देत कधी मुंबई तर कधी नागपूर पुढे असा हा अत्यंत चुरशीचा सामना शेवटचा मिनिटापर्यंत सुरू होता खेळ संपायला काही सेकंद वेळ बाकी असताना मुंबईने नागपूर वर गोल करत एक गुणांची आघाडी घेतली व तीच आघाडी निर्णायक ठरत मुंबई संघ अंतिम विजयी ठरला.

मुलांमध्ये कोल्हापूर विरुद्ध पुणे विभागाच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या संघाने पुणे विरुद्ध कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र पुणे संघाने कोल्हापूरच्या संघास वरचढ होण्याची संधीच प्राप्त होऊ दिली नाही या सामन्यात पुणे विभागाने दहा गुणांच्या फरकाने कोल्हापूर विभागाचा पराभव करत विजेतेपद काबीज केले.राज्यभरातून आलेल्या या संघाच्या राहण्याची व्यवस्था पालघर येथील यशवंतराव चाफेकर महाविद्यालयात करण्यात आली होती यामध्ये चाफेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यासोबत ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.तसेच या स्पर्धेचे संयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हणमाने व हँडबॉल असोसिशन पालघर जिल्हा संघटना आणि पालघर जिल्हा बॉक्सिंग संघटना यांनी मोलाचे सहकार्य केले व स्पर्धा यशस्वी केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!