बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला गांधीनगर सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

न्यूज महाराष्ट्र 24
मुंबई :- आसाराम बापूला अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयाने दोषी ठरविले होते.या प्रकरणी न्यायालयाने आज (३१ जानेवारी) निकाल दिला आहे. न्यायालयाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयाने आसाराम बापूला २०१३ मध्ये सुरतमध्ये मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविले आहे. आसाराम बापू हे दुसऱ्या प्रकरणी सध्या जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. तसेच या प्रकरणात आसाराम बापू यांचा मुलगा नारायण साई हा देखील आरोपी होता. न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच नारायण साईलाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.न्यायालयाने आसाराम बापूला जन्मठेपेच्या शिक्षेसोबत २३ हजारांचा दंड सुद्धा ठोठावला आहे. त्याचबरोबर पीडितेला ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी न्यायालयाने आसाराम बापूला सोमवारी दोषी ठरविले होते. यानंतर न्यायालयाने आज निकाल दिला आहे. तसेच आसाराम बापूच्या पत्नीसह सहा जणांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
नेमके काय आहे प्रकरण
सुरतमध्ये २०१३ मध्ये आसाराम बापू आणि नारायण साई या पिता-पुत्रांविरोधात दोन बहिणीवर बलात्काराची तक्रार दाखल केली होती. २००२ ते २००५ दरम्यान, नारायण साईने वारंवार बलात्कार केल्याचे पीडितेच्या लहान बहिणीने तक्रार केली होती. तर सुरतमध्ये आश्रमात असताना तिच्यावर बलात्कार झाला, असे पीडत मुलीने म्हटले होते. तर या पीडित मोठ्या बहिणीने अहमदाबामधील आश्रमात आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. यानंतर आसाराम बापू आणि त्यांचा मुगला यांच्यावर अहमदाबादच्या चांदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आसाराम बापू जोधपूर तुरुंगात बलात्काराच्या आणखी एका प्रकरणी शिक्षा भोगत आहेत.