पातोंडा येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून अंधारात जीवन जगत असलेल्या नगाव खु. येथील आदिवासी बांधवांचे जीवन झाले प्रकाशमय

न्यूज महाराष्ट्र 24
अमळनेर :- तालुक्यातील नगाव खु. येथील आदिवासी भिल्ल समाज गेल्या अनेक वर्षांपासून आपले जीवन अंधारात घालवत होते. वस्तीत विजेचे खांब नसल्याने घरात आणि जीवनात एकप्रकारे अंधार पडला होता. परंतु तालुक्यातील पातोंडा येथील सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पाटील आणि आनंद कुंभार यांनी शासनाकडे केलेला पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे आज नगाव खु. येथील आदिवासी भिल्ल समाज वस्ती प्रकाशमय झाली.
नगाव खु.येथील आदिवासी भिल्ल समाज वस्तीत जिल्हा नियोजन व एकात्मिक आदिवासी विकास विभागाकडून जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत चार विजेचे खांब मंजूर करून गेल्या अनेक वर्षांपासून अंधारात आपले आयुष्य जगत असलेल्या आदिवासी समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी तालुक्यातील पातोंडा येथील सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पाटील आणि आनंद कुंभार यांनी केलेल्या प्रयत्न आणि पाठपुरावातून नगाव खु. येथील आदिवासी भिल्ल समाज वस्ती प्रकाशमय झाली.
नगाव खु.येथील आदिवासी भिल्ल समाज वस्तीतील रहिवाश्यांनी घनश्याम पाटील आणि आनंद कुंभार यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे.
या कामासाठी जिल्हा सहाय्यक नियोजन अधिकारी श्री.सुधाकर बाविस्कर, महावितरणचे इंजिनिअर श्री.अजय वाणी, मनोज पवार, देवेंद्र पाटील आणि त्यांची टीम, तसेच नगाव खु.येथील ग्रामसेवक आणि सरपंच यांचे विशेष सहकार्य लाभले. या कामाचे सर्व स्तरातून कौतुक आणि समाधान व्यक्त केले जात आहे.
आम्ही वर्षानुवर्षे अंधारात होतो,परंतु पातोंडा येथील घनश्याम पाटील आणि आनंद कुंभार यांच्या माध्यमातून मायबाप सरकार व सरकारी यंत्रणेचे आमच्या कडे लक्ष गेले. आता महावितरण ने आज मीटर बसवून दिले. व आम्हाला प्रकाशमय केले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. — नामदेव हिंमत भिल्ल.