दहा वर्षीय मुलीचे केले अपहरण,दुष्कृत्य करून केला खून

ज्ञानेश्वर रामोशी
तलासरी :- दि. ०१, रोजी पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १० वर्ष वयाची अल्पवयीन मुलगी सकाळी ०९.०० वाजताच्या सुमारास शाळेत गेली परंतु ती घरी परतलीच नाही. तीच्या आई वडीलांनी व घरच्यांनी आजुबाजुला, परीसरात व नातेवाईकाकडे शोध घेऊन ही ती न सापडल्याने कोणीतरी अज्ञात आरोपीने तीला अमिष दाखवून व फुस लावून पळवून नेल्याबाबत तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं .६१ / २०२३ भादविसंक ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचे व गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये श्री. संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अजय वसावे, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे यांना वेगवेगळी तपास पथके तयार करून तपासाबाबत सुचना दिल्या होत्या, त्याअनुषंगाने श्री. अजय वसावे, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे यांनी वेगवेगळी चार पथके तयार केली होती. या पथकांनी तांत्रीक पुराव्यांच्या आधारे कोणतेही धागेदोरे नसतांना सखोल व कौशल्यपूर्ण तपास करुन अवघ्या २ तासात संशयीत इसम वय ४५ वर्षे, रा. तलासरी यास ताब्यात घेऊन अपहरीत मुलीबाबत कसून चौकशी केली असता आरोपी याने सदर अपहरीत मुलीस गुजरात राज्यात घेऊन जावून तीच्यावर अतिप्रसंग करुन, गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले.
या गुन्ह्यात आरोपीस अटक करून भादवि कलम ३०२, ३७६, पोक्सो कायद्या अंतर्गत अधिकची कलमे समाविष्ट करण्यात आली असून, गुन्ह्याचा अधिक तपास हा अजय वसावे, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये श्री. संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अजय वसावे, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे सपोनि / भरत पाटील, पोउपनि / उमेश रोठे, मपोउपनि / रिझवाना ककेरी, पोउपनि / समिर लॉढे, पोउपनि/भाऊ गायकवाड, पोउपनि / हर्षद शेख, सर्व नेमणुक तलासरी पोलीस ठाणे तसेच तलासरी पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.