कामनिष राऊत यांची बहुजन विकास आघाडी पालघर तालुका युवा अध्यक्ष पदी नियुक्ती

ज्ञानेश्वर रामोशी
बोईसर :- बहुजन विकास आघाडी पालघर तालुका युवा अध्यक्ष पदी कामनिष संजय राऊत यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती बहुजन विकास आघाडी पक्षप्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, प्रथम महापौर राजीव नाना पाटील, आमदार राजेश पाटील यांच्या आदेशान्वये कामनिष संजय राऊत यांचे पालघर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वाढते वर्चस्व तसेच पालघर तालुक्यातील युवा तरुणांनी कामनिष संजय राऊत यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडी मध्ये घेतलेला पक्ष प्रवेश तसेच डिसेंबर 2022 रोजी पालघर तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांपैकी मांडे विठ्ठलवाडी, कांद्रेभुरे, खार्डी दातीवरे, सफाळे कर्दळ या ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी शनिवारी ४ मार्च रोजी कामनिष संजय राऊत यांची पालघर तालुका युवा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. सफाळे मांडे येथील कामनिष राऊत हे माजी जिल्हा परिषद सदस्य कै.संजय राऊत यांचे सुपुत्र आहेत. या आधी पालघर तालुका बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष म्हणून महेंद्र राजपूत कार्यरत होते. त्यांच्या जागी आता नव्याने का संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आल्याने माथाडी कामगार टोळी क्रमांक ४७७ चे सदस्य राकेश धानमेहेर, दिलीप चव्हाण, गणेश बोरुडे, ज्ञानदेव आटपाडकार, संजय कोळेकर, अंकुश कोळेकर, नवनाथ बोरुडे, रवींद्र ठाणगे, सुनील कोळेकर, विनोद गायकवाड, उमेश डाईंगडे, अमर चव्हाण, किशोर यादव, चंद्रशेखर प्रजापती, विकास कुमार, दिनेश चव्हाण, भीमराव हरगे, दिलीप गंजाळ,बाबाजी खामकर यांनी मोठा जल्लोष करीत कामनिष राऊत यांचे अभिनंदन केले.