तणाशी ग्रामपंचायती मध्ये मोठा भ्रष्टाचार, कामे न करताच काढली बिल

ज्ञानेश्वर रामोशी
बोईसर :- डहाणू तालुक्यातील तणाशी ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या माहिती द्वारे उघडकीस आले आहे.जे काम प्रत्यक्षात केलीच नाही त्या कामाचे बिले काढले गेली आहेत.
तणाशी गावाचे तत्कालीन ग्रामसेवकांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले बाबत जागरूक नागरिकांनी माहिती अधिकार टाकत हि माहिती मिळवली आहे.प्लॉट पाडा स्मशान भूमीचे कोणत्याही प्रकारचे काम केले नसून परंतु ते काम दाखवत लाखों रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे.
भिंतींना मोठ मोठे तडे गेले आहेत
ग्रामपंचायती मध्ये एकाच वर्षात नऊ वेळा रंगरंगोटी चे काम करण्याचा नावाखाली एक लाख २७ हजार रुपयांचे बिल काढण्यात आले आहे.समाज मंदिर दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये काढले गेले आहेत.मात्र समाज मंदिर चे प्रत्यक्षात कोणतेही काम केले नसल्याचे दिसून येत आहे. टीसीएल पावडर मध्ये मोठा भ्रष्टाचार दिसून येत आहे. २०२०/२१ मध्ये एका वर्षात तीन लाख १६ हजार रुपयांनी खरेदी केली आहे.तर २०२१/२२ मध्ये परत सत्तर हजार रुपयांचे खरेदी केली असल्याचे दाखवले आहे. तीन लाख ३० हजार रुपयांचे बाकडे खरेदी केले असल्याचे दाखवण्यात आले आहेत मात्र गावात मोजून दहा बारा बाकडे हे पहावयास मिळत आहेत.
स्मशान भूमी तणाशी
दोन वर्षांपूर्वी प्लॉट पाडा भागात स्वच्छतागृह बांधले गेले परंतु अतिशय नित्कृष्ट दर्ज्याचे बांधकाम केले असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे त्यात पाण्याची सोयच नसल्याने ते तसेच पडलेले आहे.अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या फक्त नावाने करण्यात आले असून प्रत्यक्षात कामे केलीच नसल्याने माहिती अधिकारात मिळालेल्या माहिती नुसार समोर आली आहे.
या बाबत गट विकास अधिकारी डहाणू यांना विचारले असता हे काम तत्कालीन ग्रामसेवकांचे आहे. आणि त्याबाबतीत न्यूज महाराष्ट्र २४ ने बातमी प्रकाशित केल्यानंतर चौकशी लावण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
याबाबत आदिवासी पाड्यातील रहिवाश्यांनी न्यायाची अपेक्षा करत कारवाईची मागणी केली आहे.
याबाबतीत सोशल मीडिया वर बातमी प्रकाशित केल्यानंतरही जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी दखल न घेतल्याने अद्यापपर्यंत या बाबतीत कोणत्याही प्रकारची चौकशी केली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषद पालघर चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत दखल घेत कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.