पालघर

खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न

ज्ञानेश्वर रामोशी

शेतकऱ्यांना खते व बियाणे यांची कमतरता भासणार नाही—–पालकमंत्री रविंद्र चव्हाण

पालघर : जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध आहेत.आवश्यकता भासल्यास खाते व बियाणांची पुन्हा मागणी करण्यात येईल. येत्या खरीप हंगामा मध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे कमी पडू देणार नाही असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून ) अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढाव बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते.

यावेळी खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार सुनील भुसारा, विनोद निकोले, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जव्हारच्या प्रकल्प अधिकारी आयुषी सिंह, डहाणूच्या प्रकल्प अधिकारी संजिता महापात्र जिल्हा कृषी अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी , डॉ कीरण महाजन, उपजिल्हाधिकारी (सा प्र ) संजीव जाधवर, तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील लागवडी योग्य क्षेत्र दुप्पटीने वाढविण्यासाठी कृषि विभागाने नियोजन करावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषि पतपुरवठा मिळावा, याकडेही लक्ष द्यावे. एक रुपयात पिक विमा या योजनेपासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहता कामा नये, याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागातील भाजीपाला तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांना शहरी भागात मोक्याच्या जागा उपलब्ध करून देण्याविषयी आराखडा तयार करावा. यामुळे नागरिकांना ताजा भाजीपाला मिळेल व शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव ही मिळेल.

नागली, वरई व बांधावरील तूरीच्या उत्पादनावर भर देण्याची सूचनाहि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली. जिल्ह्यात भात व नागली या पिकांबरोबरच हळद, सोनचाफा फुलांच्या उत्पादन वाढीवर भर देण्यात येत आहे. तसेच भात पिकाचे सरासरी उत्पादन वाढविण्यावर कृषि विभाग भर देत आहे. जिल्ह्यात लागवडी खालील एकूण क्षेत्र १लाख ४४ हजार ४२५ हेक्टर असून सर्वसाधारण खरीप हंगाम क्षेत्र १ लाख ४ हजार ९६२ हेक्टर आहे. प्रमुख खरीप पिकांच्या क्षेत्रामध्ये भात पीक लागवडीचे क्षेत्र ७९ हजार ७६६ हे, नागली पीक लागवडी खालील क्षेत्र ११ हजार ९२३ हे, आणि वरई पीक लागवडीखालील क्षेत्र ८ हजार ४४८ हे, तसेच कडधान्य पीक लागवडी खालील क्षेत्र ७ हजार ६८१ हे, गळीत धान्य पीक लागवडी खालील क्षेत्र १ हजार ८८९ हेक्टर आहे. या प्रमुख खरीप पिकांसाठी तसेच इतर पिकांसाठी सुद्धा शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते व बियाणांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!