जुनी पेन्शन योजनेचा लढा तिव्र करण्याचा निर्धार! पेन्शन हक्क संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहिर

एच. लोखंडे
पालघर :- राज्यातील शासकीय कर्मचार्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पालघर जिल्हा कार्यकारिणी पुनर्रचना करुन नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. सरकारी कर्मचारी वर्गाला जुनी नागरी निवृत्ती वेतन योजना लागू करावी या साठी सन २०१५ साली महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची स्थापना करण्यात आली होती. नविन लोकांना काम करण्याची संधी मिळावी यासाठी, मागील दोन वर्षापासून पालघर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनेची नवीन कार्यकारिणीची निवड करण्याचे काम प्रलंबित होते. दिनांक 20 नोव्हेंबर २०२२ रोजी जि.प.शाळा मनोर .ता,जि पालघर या ठिकाणी डिसिपीएस धारक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या घेण्यात आलेल्या सभेत, जिल्हा कार्यकारिणी ची पुनर्रचना करुन नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.
श्री. प्रवीण बडे – राज्यकोषाध्यक्ष, श्री. राजेश पाटील – राज्य समन्वयक यांचे निरीक्षणात आणि जिल्हाध्यक्ष श्री. नितीन तिडोळे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या सभेत खालील प्रमाणे नूतन जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. जिल्ह्याध्यक्ष – श्री लक्ष्मण नन्नावरे, सचिव – श्री.प्रदीप गायकवाड, कार्याध्यक्ष – श्री जयदेव घेगड, कोषाध्यक्ष – श्री. अजित जरे, संपर्क प्रमुख श्री.व्यंकट लोकरे, महिला अध्यक्ष – सौ.उत्तरा जाधव, प्रसिद्धी प्रमुख -श्री. दत्ता ढाकणे (बावीकर) मुख्य संघटक – श्री. महेश शेकडे यांची निवड करण्यात आली तसेच, प्रत्येक तालुक्यातुन एक जिल्हा उपाध्यक्ष या प्रमाणे श्री. गोपाळ सूर्यवंशी (वाडा), श्री. सचिन बरबडे (पालघर) ,श्री. तुकाराम फापाळे (तलासरी), श्री. शाहू भारती (डहाणू) श्री. सुरेंद्र गावित (जव्हार ) यांची नेमणूक करण्यात आली आहे. तरसहसचिव श्री. अमोल वाकचौरे,सह कोषाध्यक्ष श्री. अविनाश साबळे, सह कार्याध्यक्ष श्री. किरण बारगजे, सह संपर्क प्रमुख श्री. भिलू जाधव, सह प्रसिद्धी प्रमुख श्री. रोहिदास कासार,सह समन्वयक श्री. अमोल चीवरे, आश्रम शाळा प्रमुख : श्री. मोहन सोनटक्के, सह प्रवक्ता श्री. किशोर पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदर सभेला पालघर जिल्ह्यातील शेकडो डीसिपीएस धारक शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक,आरोग्य सेवक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकजुटीने जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नेतृत्वाखाली एकञ येऊन जुनी पेन्शन चा लढा आजून तिव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. सदर माहिती श्री. दत्ता ढाकणे कडून मिळत आहे.