पालघर

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

ज्ञानेश्वर रामोशी

पालघर दि. 24 : अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या जातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थांचे जात प्रमाणपत्र वैधता तपासणी करिता संबंधीत शैक्षणीक संस्था कडे दिनांक 30 नोव्हेंबर अर्ज करावे त्याकरिता विद्यार्थ्यांनी ( www.bartievalidity.maharashtra.gov.in ) या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) ऑनलाईन अर्ज केल्यानंतर 1 महिन्यांच्या आत शैक्षणिक संस्था मार्फत ऑफलाईन (Hard Copy) अर्ज जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कार्यालय पालघरकडे सादर करणे आवश्यक आहे. त्याकरिता, प्रत्येक शैक्षणिक संस्थेने नोडल अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे.

संबंधित नोडल अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांचे ऑफलाईन (Offline) अर्ज समिती कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर यांनी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, सीईटी देणारे, डिप्लोमा तृतीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम राबविण्यात यावी . तसेच, इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, सीईटी देणारे, डिप्लोमा तृतीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, सामाजिक समता सप्ताह, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता – सेवा पंधरवडानिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहिम वेळोवेळी राबविण्यात आली. दरम्यान, अनुसूचित जाती, विजा भज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विज्ञान शाखेच्या इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शिकत असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता समितीकडे विहित कालमर्यादेत अर्ज करणे आवश्यक आहे.जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पालघरद्वारे महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांना माहिती व्हावी या दृष्टीकोनातून दिनांक 25/11/2022 रोजी दुपारी 12 वाजता वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर वेबिनारची लिंक पुढील प्रमाणे आहे. विषय : “मंडणगड पॅटर्न” प्रमाणे जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहिमेबाबत वेबिनार दिनांक 25 नोव्हेंबर 2022 वेळ दु. 12 वाजता Google Meet Joining info Video Call link : meet.google.com/kav-moqb-aqm या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!