पालघर

चिंचणी येथे जात वैधता पडताळणी प्रमाणपत्राचे वितरण

ज्ञानेश्वर रामोशी

बोईसर :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन आणि आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे व महासंचालक (बार्टी) पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पालघर यांच्यामार्फत इयत्ता ११ वी व इ.१२ वी सायन्सच्या विद्यार्थ्यांकरता मंडणगड पॅटर्न राबविण्यात येत आहे.

महाविद्यालयीन स्तरावर चर्चासत्र व कार्यशाळा तसेच जात वैधता प्रमाणपत्र वाटप चिंचणी च्या एम.के.ज्युनिअर कॉलेज मध्ये १८ विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप व ४८ अर्ज जमा करण्यात आले. यावेळी एस. आर. करंदीकर ज्युनिअर काॕलेज डहाणू, फिरोजशाह गोदरेज ज्युनिअर काॕलेज बोर्डी, व राहूल इंटरनॅशनल ज्युनिअर काॕलेज बोईसर येथील नोडल आॕफिसर प्रतिनिधींना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख अप्पर जिल्हाधिकारी निवड श्रेणी तथा अध्यक्ष मा. श्री. विवेक गायकवाड साहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जात प्रमाणपत्र हे इयत्ता १० वी पर्यंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत मिळवण्यासाठी उपयोगी पडते. परंतु पुढील शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र अत्यंत उपयोगी आहे. भारतीय घटनेमध्ये जात निहाय परिशिष्ट तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार जातीचे पुरावे असल्यास जात पडताळणी करण्यास सुलभता येते. विद्यार्थ्यांनी प्रथम आपला जातीचा दाखला काढून घ्यावा; जातीचा दाखला सुद्धा आता ऑनलाइन पद्धतीने आपणास मिळू शकतो. एकदा जातीचा दाखला मिळाला की जात पडताळणी व्हायला वेळ लागत नाही. यासाठी दुसरे कोणतेही माध्यम न वापरता विभागाच्या नोडल ऑफिसर बरोबर संपर्क साधावा. याप्रसंगी जात पडताळणी विभागाकडून प्रकाश तायडे, भावेश चांबरे , चिंचणी तारापूर शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.श्री.रजनीकांतभाई श्रॉफ, प्राचार्य महेश रावते, उपमुख्याध्यापक सुनील बैसाणे, उपप्राचार्या संगीता चुरी, पर्यवेक्षक संजय घरत, पर्यवेक्षिका स्वाती राऊत, वाणिज्य विभाग प्रमुख दिनकर टेकनर , नोडल आॕफिसर चैताली पाटील, वर्षा चुरी, शैला वनमाळी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!