क्रीडा

अभिषेक–शुभमनची जोडीचा विश्वविक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहास घडवणारी पहिली भारतीय जोडी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेत अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या भारतीय जोडीने विक्रमी कामगिरी करत क्रिकेट विश्वात नवा इतिहास रचला आहे.

५ सामन्यांच्या मालिकेत दोन सामने पावसामुळे रद्द झाले असले तरी, भारताने २-१ ने मालिका आपल्या नावावर केली. या मालिकेत अभिषेक आणि शुभमनने एकत्रितपणे केलेल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले.

विक्रमात्मक भागीदारी

अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना एकाच टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारी भारतीय जोडी ठरली आहे. या दोघांनी मिळून १८८ धावांची भागीदारी केली आहे.याआधी दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिस आणि ट्रिस्टन स्टब्स या जोडीने याच वर्षी १८७ धावांची भागीदारी करून विक्रम केला होता. मात्र अभिषेक–शुभमन जोडीने हा विक्रम मोडून काढला.२०१६ मध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८३ धावांची भागीदारी केली होती.

ऑस्ट्रेलियात टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या जोड्या

क्रमांक जोडी धावा वर्ष1 अभिषेक शर्मा – शुभमन गिल १८८ २०२५2 डेवाल्ड ब्रेव्हिस – ट्रिस्टन स्टब्स १८७ २०२५3 रोहित शर्मा – शिखर धवन १८३ २०१६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button