निवडणुका पुन्हा ढकलल्या! बारामती–अंबरनाथसह १० नगरपालिकांमध्ये मतदान आता २० डिसेंबरला

मुंबई :- आरक्षणासंबंधी उद्भवलेल्या कायदेशीर पेचामुळे बारामती, अंबरनाथ, महाबळेश्वर, फलटणसह राज्यातील १० नगरपालिकांमधील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी आता २० डिसेंबरला मतदान होणार असून २१ डिसेंबरला मतमोजणी पार पडेल.
पहिल्या टप्प्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी उद्या (मंगळवारी) मतदान होणार असताना, केवळ ४८ तास उरलेले असताना आयोगाला अचानक निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. काही ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावर आक्षेप नोंदवण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रिया थांबवावी लागली तर काही ठिकाणी प्रभागनिहाय मतदान स्थगित झाले आहे.
१० नगरपालिकांची संपूर्ण निवडणूक रद्द व स्थगित
पुणे : बारामती,
ठाणे : अंबरनाथ,
सातारा : महाबळेश्वर, फलटण,
अहिल्यानगर : कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा, पाथर्डी सोलापूर : मंगळवेढा
अकोला : बाळापूर
चंद्रपूर : घुग्गूस
प्रभागनिहाय मतदान स्थगित
धाराशिव शहर : प्रभाग २ब, ७ब, १४ब
कुळगाव–बदलापूर : प्रभाग ५ब, १५ब, १७अ, १०ब, ८अ, १९अ
तळेगाव व लोणावळा : प्रत्येकी ६ प्रभाग
मावळ : २ प्रभाग
गडचांदूर : प्रभाग ८
मूलनगर : प्रभाग १० ब
गोंदिया : प्रभाग ३, ११, १६
यवतमाळ : दिग्रस, पांढरकवडा, वणी
नांदेड : मुखेड, धर्माबाद, भोकर, कुंडलवाडी, लोहा (प्रत्येकी १ जागा)
पालघर प्रभाग क्रमांक १-ब
वाडा प्रभाग क्रमांक १२
नवीन वेळापत्रक
निवडणूक कार्यक्रम जाहीर : ४ डिसेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत : १० डिसेंबर (दुपारी ३ पर्यंत)
चिन्ह वाटप व अंतिम यादी : ११ डिसेंबर
मतदान : २० डिसेंबर



