ठाणे

लाडकी बहिण योजना कधीच बंद होणार नाही!” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

ठाणे : “कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी ‘लाडकी बहिण’ योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही,” असे ठाम आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ठाण्यात शिवसेना पुरस्कृत साई दर्शन फाउंडेशनतर्फे आयोजित ‘महिला बचत गट स्नेहसंमेलन २०२५’ या कार्यक्रमात ते बोलत होते.या प्रसंगी शिंदे म्हणाले, “महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मी आलो आहे. लाडक्या बहिणींमुळेच मी सव्वा लाख मतांच्या आघाडीने निवडून आलो. त्यांच्या आशीर्वादानेच आज मी राज्याचा मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळवली.”लाडकी बहिण योजनेमुळे अनेक महिलांनी छोट्या-मोठ्या उद्योगांना सुरुवात केली, घरात मान मिळवला आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली असल्याचेही त्यांनी सांगितले.“महिलांना लखपती बनवण्याचा आमचा मानस आहे. यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही महायुतीला अशीच साथ द्या,” असे आवाहन करत शिंदेंनी महिलांना प्रोत्साहन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button