जळगांव

पातोंडा येथे उत्पादन शुल्क विभागाची धाड : देशी-विदेशी दारूसह मोटारसायकल जप्त

देशी विदेशी ताडी सह मोटारसायकल असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त

अमळनेर (वार्ताहर) — राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पातोंडा येथे धाड टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्या चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून देशी, विदेशी दारू, ताडी आणि मोटारसायकल असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक वाय. वाय. सूर्यवंशी, अमळनेरचे दुय्यम निरीक्षक जी. एस. मोरे, तसेच अधिकारी रघुनाथ सोनवणे, नरेंद्र पाटील, नंदकिशोर पवार आणि पूनम पाटील यांच्या पथकाने ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ वाजेदरम्यान पातोंडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात ही कारवाई केली. कारवाईदरम्यान संजय रघुनाथ कुंभार, भाऊसाहेब श्यामराव वाघ, देविदास संदानशिव आणि रमेश संदानशिव हे चौघे अवैधपणे गावठी, देशी व विदेशी दारू तसेच ताडी विक्री करताना आढळून आले.पथकाने ठिकाणाहून दारूच्या बाटल्या आणि वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले. चौघांविरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button