गुन्हे वार्ता

संगमनेरमध्ये ‘गांजाचे गोदाम’, तब्बल ४५६ किलो गांजा जप्त, पिता अटक – पुत्र फरार

संगमनेर :- शहरालगतच्या सुकेवाडी परिसरात गुरुवारी नाशिक पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई करत तब्बल ४५६ किलो सुका गांजा जप्त केला. या मुद्देमालाची किंमत तब्बल १ कोटी १४ लाख रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पिता–पुत्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले असून पिता उत्तम पडवळ याला अटक करण्यात आली आहे, तर मुलगा तुषार पडवळ फरार आहे.

गुप्त माहितीच्या आधारे धाड – गोदाम आणि टेम्पोतून प्रचंड साठा

पोलीस उपअधिक्षक गुलाबराव पाटील यांना सुकेवाडीत अमली पदार्थांची मोठी खेप जमा केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने अचानक धाड टाकून तुषार पडवळच्या गोदामाची झडती घेतली.

घरातून ३०० किलो गांजा जप्त

छोट्या टेम्पोतून १५६ किलो गांजाअसा एकूण ४५६ किलो गांजा जप्त करण्यात आला. यासोबत इतर साहित्यही ताब्यात घेण्यात आले.

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल – एक अटक, एक फरार

अंमलदार वैभव पांढरे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यातउत्तम बबन पडवळ (५५) – अटकतुषार उत्तम पडवळ (३१) – फरारअसे गुन्हे दाखल करण्यात आले.

एवढा मोठा साठा शहरालगत – स्थानिक पोलिसांना माहितीच कशी नाही?

नाशिकचे पथक संगमनेरात धाड टाकते,पण स्थानिक पोलिसांना या व्यवहाराची खबरच नाही – ही बाब चर्चेचा विषय बनला आहे.यापूर्वीही जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये ६०० किलो गांजा जप्त झाल्याची कारवाई झाल्याने या प्रकारांमध्ये आंध्रप्रदेश–महाराष्ट्र ‘नेटवर्क’ सक्रिय असल्याचे संकेत अधिक बळकट झाले आहेत.

नगरपालिकेच्या निवडणुकीत मुद्दा झाला होता ‘हॉट’ – आता ठरला सत्य?

नुकत्याच झालेल्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात संगमनेर अमली पदार्थांचे केंद्र बनत असल्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता.माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही या मुद्द्यावर प्रचारात भर दिला होता.

आता नाशिक पथकाच्या या कारवाईमुळे त्या आरोपांना ठोस आधार मिळाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button