पालघर

जिल्ह्यामध्ये जलसंधारण योजनांना गती

पालघर दिनांक ३१ डिसेंबर : पालघर जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या जलसंधारणाशी संबंधित विविध महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली या वेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी शासनाच्या सकारात्मक धोरणामुळे जिल्ह्यामध्ये जलसंधारण योजनांना गती मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झालेल्या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे , उपजिल्हाधिकारी (सामान्य) रणजित देसाई, उप जिल्हाधिकारी (रो.ह.यो.) विजया जाधव तसेच जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जलयुक्त शिवार २.० लघुसिंचन योजनांची ७ वी प्रगणना व जलसाठ्याची २ री प्रगणना प्रत्यक्ष स्थळ पडताळणी (Ground Truthing) गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार व नाला खोलीकरण व रुंदीकरण जलशक्ती अभियान ‘कॅच द रेन’ अंतर्गत ‘जल संचय, जन भागीदारी (JSJB) २.०’या योजनांचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी घेतला.

१३५२ कामे पूर्ण; प्रगती वाढवण्याच्या सूचनाबैठकीत सदस्य सचिव तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी फरीद खान यांनी योजनानिहाय प्रगतीचा आढावा सादर केला.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग व कृषी विभागामार्फत एकूण १,३५२ कामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. याबाबत समाधान व्यक्त करताना, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी योजनेची गती आणखी वाढवण्यासाठी सर्व यंत्रणांनी लक्ष लक्ष घालावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले.

जलयुक्त शिवार २.० अंतर्गत २,२६० कामे पूर्णराज्य शासनाच्या जलयुक्त शिवार २.० योजनेंतर्गत इतर योजनांतून १,४७१ कामे तर विशेष निधीतून ७८९ कामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.

कामांची गुणवत्ता राखत योग्य नियोजनाने वेळेत कामे पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी दिले.

प्रगणना आणि प्रत्यक्ष स्थळपडताळणीला गतीलघुसिंचन योजनांची ७ वी प्रगणना व जलसाठ्याची २ री प्रगणना अंतर्गत १,००९ गावांमध्ये प्रगणना कामे सुरू असून, ही कामे मृद व जलसंधारण विभागामार्फत होत आहेत.

तसेच प्रत्यक्ष स्थळपडताळणी योजनेअंतर्गत २८,५३९ कामांपैकी ११,२११ कामांचे मॅपिंग पूर्ण झाले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. याबाबत प्रगती वेगाने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले.

गाळमुक्त धरण, नाला खोलीकरणाचे ठोस परिणामगाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनेंतर्गत ४ कामे पूर्ण होऊन १६,५२० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

तलासरी तालुक्यातील अनवीर दाभाडेपाडा नाला खोलीकरणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याची कामे पूर्ण करून गाव तलाव व नाल्यांतील पाणीसाठा वाढवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी दिले.

‘जल संचय, जन भागीदारी’ २.० ला व्यापक सहभागाचे आवाहन

जलशक्ती मंत्रालयाच्या ‘कॅच द रेन’ मोहिमेअंतर्गत ‘जल संचय, जन भागीदारी (JSJB) २.०’ हा केंद्र व राज्य सरकारांचा संयुक्त उपक्रम असून, त्याचा कालावधी १ जून २०२५ ते ३१ मे २०२६ असा आहे.

या उपक्रमांतर्गत विविध यंत्रणांनी पूर्ण झालेल्या जलसंधारण व पर्जन्यजल संचयन कामांची माहिती पोर्टलवर वेळेत अपलोड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी दिल्या.

सर्व यंत्रणांनी सक्रिय सहभाग नोंदवून जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.

जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी उपलब्धता वाढवणे, शेतकरी व ग्रामस्थांना दीर्घकालीन लाभ मिळवून देणे हे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून, सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास पालघर जिल्हा जलव्यवस्थापनात आदर्श ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button