पालघर

बेटेगाव स्मशानभूमी बनली ‘वॉशिंग सेंटर’; ॲम्ब्युलन्स धुण्यासाठी पाण्याचा अपव्यय

बोईसर (प्रतिनिधी) – पालघर तालुक्यातील बेटेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेली स्मशानभूमी सध्या वाहन धुण्याच्या केंद्रात रूपांतरित झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी असलेली ही जागा आता ॲम्ब्युलन्स आणि इतर वाहनं धुण्यासाठी वापरली जात असून, दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, स्मशानभूमीत उपलब्ध असलेल्या पाण्याच्या वापर ॲम्ब्युलन्स आणि खाजगी वाहनं धुण्यासाठी केला जात आहे. काही वाहनधारकांनी तर हे नियमितच काम बनवले असून, याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे.

या सर्व प्रकारामुळे केवळ पाण्याचा अपव्यय होत नाही, तर स्मशानभूमीचा पवित्रपणाही नष्ट होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.याचदरम्यान, महिन्याला येणारे वीज बिल हे सर्व सामान्य जनतेचा नशिबी मारले जात असून या पाण्याचा योग्य वापर न होता तो वाहन धुण्यासाठी खर्च होतो आहे, हे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचे प्रतीक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या गोष्टींची कल्पना मात्र ग्रामपंचायतीला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button