पालघर

“तक्रारींचा ढिग, निर्णय नाही! पालघर NCP मध्ये जिल्हाध्यक्ष बदल अडकला?”

पालघर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) मध्ये पालघर जिल्हा नेतृत्वाबाबत गंभीर नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हाध्यक्षपद हे डहाणू येथील मा. आमदार यांच्या कडे आहे. मात्र ते जिल्ह्यात इतर ठिकाणी अदृश्य असल्याचा आरोप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. अनेकदा लिखित आणि मौखिक तक्रारी वरिष्ठांकडे देऊनही जिल्हाध्यक्ष बदलाचा प्रश्न कायम प्रलंबितच ठेवला गेल्याने रोष आणखी वाढला आहे.

💢 कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा उद्रेक

जिल्ह्यातील कार्यकर्ते नेहमी सांगत आहेत की —“पक्ष सत्तेत असूनही जिल्ह्यात आमची विचारपूस नाही, बैठक नाही, योजनांची माहिती नाही. नेतृत्वच जेव्हा ठिकाणी नसतं, तेव्हा पक्ष कसा मजबूत होणार?”

या निष्क्रिय नेतृत्वामुळे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी हतबल झाले असून, ते पक्षाचा रामराम करून इतर पक्षांकडे वळत आहेत. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे की, “नेतृत्व बदलत नाही, त्यामुळे पक्षात राहण्यात अर्थ उरलेला नाही.”

कार्यालय नसल्याचा मोठा सवाल

जिल्हा मुख्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत संपर्क कार्यालयच नसणे हा मोठा आणि गंभीर मुद्दा पुढे येत आहे.सत्तेत असलेल्या पक्षाचे जिल्ह्यात कार्यालयच नसणे हे प्रशासनिक दुर्लक्ष आणि संघटनात्मक कमकुवतपणाचे स्पष्ट उदाहरण मानले जात आहे.

मग जिल्हाध्यक्ष बदल का होत नाही? एवढी मेहरबानी कोणासाठी?

हीच चर्चा सध्या जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे—अनेक तक्रारी, कार्यकर्त्यांचे पक्षत्याग, संघटनाची विस्कळीत अवस्था, तरीही जिल्हाध्यक्ष बदलाचा विषय पुढे का नेला जात नाही? कोणासाठी किंवा कशासाठी ही विशेष मेहरबानी ठेवली गेली आहे? असा सवाल आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्येही वाढत चालला आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंभीर स्थिती

पालघर हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वाचा जिल्हा असून, अशा परिस्थितीत सक्षम, सक्रिय आणि सर्वांना न्याय देणारे नेतृत्व अत्यंत आवश्यक आहे. वेळेत निर्णय न झाल्यास पक्षाला येत्या काळात मोठा राजकीय फटका बसू शकतो, अशीही पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button